मुंबई – ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ता आई झाली आहे. तिने 19 जुलै रोजी गोंडस बाळासा जन्म दिला आहे. यामुळे इशिता आणि तिचा पती वत्सल शेठ आनंदी आहेत. लग्नाच्या 6 वर्षानंतर हे दोघे आई-बाबा झाले आहेत. यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या इशिता आणि बाळाची प्रकृती ठीक असून त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गरोदरपणात इशिताने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स देत असतं. मागील मंगळवारीच इशिताने फोटो शेअर करत शेवटचा महिना सोपा नसल्याचे म्हंटले होते. तर यापूर्वी इशिता दत्ताने तिच्या प्रेगन्सी दरम्यान तिचे बेबी बंप फ्लॉंट करतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच बंगाली रितीरिवाजांनुसार तिने डोहाळजेवण केल्याचेही दिसून आले. त्याचे फोटो इशिताने शेअर केले होते.
दरम्यान, इशिता आणि वत्सलने 31 मार्च रोजी आपल्या पहिल्या बाळाची गुडन्यूज शेअर केली होती. त्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. 28 नोव्हेंबर 2017 रोजी वत्सल शेठ आणि इशिता दत्ता लग्नबंधनात अडकले होते. ‘दृश्यम’ चित्रपटांमध्ये अजय देवगणच्या मोठ्या मुलीची भूमिका अभिनेत्री इशिता दत्ताने साकारली होती. तर ‘टार्झन’ चित्रपटात अजय देवगणच्या मुलाची भूमिका वत्सलने साकारली होती.