‘दृश्यम २’च्या दिग्दर्शकाचे चाहत्यांना सरप्राईज; ‘दृश्यम ३’ बद्दल केला मोठा खुलासा…

मुंबई – दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार ‘मोहनलाल’ यांच्या ‘दृश्यम २’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार हवा सुरु आहे. मोहनलाल यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाची अधीकृत घोषणा केली होती. २०१३ साली या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. ‘दृश्यम २’ मध्ये मोहनलाल जोर्गेकुटी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत.

सध्या ‘दृश्यम २’ हा चित्रपट प्रेक्षक, समीक्षक सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. पहिल्या ‘दृश्यम’ची कथा पुढे नेणारी ‘दृश्यम २’ची कथा आहे. पण आता ही कथा पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच या दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी एक खास घोषणा केली आहे.

सध्या जोसेफ यांच्या डोक्यात ‘दृश्यम’चं रहस्य सोडवण्याचा विचार चालू असून, त्यांनी आता या चित्रपटाचा आणखी भाग म्हणजेच, “दृश्यम ३’ ची घोषणा केली. हा तिसरा भाग चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कथा पुढे नेईल आणि हा तिसरा भाग या मालिकेतला शेवटचा भाग असेल. असं ते म्हणतात. जोसेफ यांनी ट्विट करत याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.