मुंबई – गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. आता यावरूनच लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी यावर टीका केली आहे. सुरेखा पुणेकर यांनी माध्यमांशी बोलतांना अप्रत्यक्षरित्या गौतमी पाटीलवर निशाणा साधला.
सुरेखा पुणेकर यांनी म्हणाल्या, ‘जी लावणीसम्राज्ञी अंगविक्षेप करुन आपली कला सादर करते तिला लोकं सोडणार नाही. ज्या लावणी सम्राज्ञीकडे कला आहे, तिला प्रोत्साहन द्या. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करुन नाचणे याला लावणी म्हणत नाहीत. लावणी कलेला योग्य प्रकारे सादर गेले केले पाहिजे. नाहीतर महिला स्टेजवर जाऊन मारतील. जी कलाकार चांगली आहे, तिला नक्कीच तुम्ही डोक्यावर घ्या, तिला प्रोत्साहन द्या. पण जी अश्लील वर्तन करते, जी अपुरे कपडे घालते, तिला तुम्ही समाजात अजिबातच स्थान देऊ नका. नाहीतर महाराष्ट्राचा देखील बिहार होईल.’ असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.