लोणंद – लोणंद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या शिक्षकावर पोक्सोंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. लोणंद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रीशियन विषयाचा कंत्राटी शिक्षक विकास तानाजी बोडरे (वय ३२, मूळ रा. विठ्ठलापूर ता. आटपाडी जि. सांगली. हल्ली रा. बाजारतळ लोणंद) याने अल्पवयीन विद्यार्थ्यांला दिनांक २४ मार्च २०२२ रोजी काम आहे असे सांगत स्वतःच्या रूमवर बोलावून घेत त्याच्या गरीबीचा आणि असहाय्यतेचा फायदा घेत धमकी देत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.
मागील नऊ महिन्यांत या विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार असह्य झाल्यावर पिडीत मुलाने आयटीआयमधील सुपरवायझर शिक्षकेस प्रकार सांगितल्यानंतर शिक्षिकेने पिडीत मुलास चाईल्ड हेल्पलाईन ( Child helpline 1098) वर फोन करून माहिती देण्यास सांगितले. तसेच पोलीसात तक्रार दाखल करण्यासाठी सोबत येत तक्रार दाखल केली. याप्रकरणी आयटीआय शिक्षक विकास बोडरे याच्यावर लोणंद पोलीसात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणंद पोलीसांनी या शिक्षकास तात्काळ अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करीत आहेत .