मुंबई – बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश टीव्हीनंतर लवकरच चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आयुष्मान खुरानाच्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. नुकतेच तेजस्वीने या चित्रपटासाठी ऑडिशन दिले आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाशला नागिन 6 ही मालिका मिळाली होती. या मालिकेमुळे ती घरोघरी प्रसिद्ध झाली आहे. छोट्या पडद्यावर थिरकल्यानंतर तेजस्वी लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
तेजस्वीच्या ड्रीम गर्ल २ या चित्रपटातील कामाची चर्चा जोरात सुरू आहे. या चित्रपटासाठी तिने ऑडिशनही दिले आहे. तेजस्वी लवकरच आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग २ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी शूटिंग जूनमध्ये सुरू होणार होते, परंतु पावसाळ्यामुळे पुढे शेड्यूल करण्यात आले.
तेजस्वीला याआधी एकता कपूरच्या रागिनी एमएमएस या चित्रपटाच्या पुढच्या भागाची ऑफर देण्यात आली होती पण तिने या प्रोजेक्टवर काम करण्यास नकार दिला होता. आयुष्मान खुरानाच्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा चर्चा असल्या तरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
विशेष म्हणजे ड्रीम गर्ल हा चित्रपट 2019 च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. ड्रीम गर्लचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले होते. चित्रपटातील आयुष्मानची व्यक्तिरेखा लोकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली.