पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुळा-मुठा नदीकाठ विकसन तसेच नदीसुधार प्रकल्पांतर्गत झालेल्या आतापर्यंतच्या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
या आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी पक्षाच्या वतीने नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेत आतापर्यंत मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाबाबत, जयका प्रकल्प बाबत श्वेतपत्रिका काढावी. तसेच येत्या सात दिवसांत पत्रकार परिषद घेऊन नदी सुधार प्रकल्पाबाबत ची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी केली.
उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, कुणाल घारे, सचिव अमोल मोरे, प्रभाकर कोंढाळकर, शिक्षक आघाडी अध्यक्ष शीतल कांडेलकर, शंकर थोरात, कुमार धोंगडे, सुनील भोसले, किरण कांबळे, उमेश बागडे, आसिफ मोमीन, अविनाश भाकरे, गणेश थरकुडे, हृषिकेश मारणे यावेळी उपस्थित होते.