डॉ. विखेंचा पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न

श्रीगोंदा: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप, सेना, आरपीआय, रासप या महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात आता पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. काष्टी येथे त्यांनी आज तालुक्‍यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढली.

डॉ. विखे पाटील यांनी आपल्या निवडणुक प्रचारात महायुतीतील घटक पक्षांच्या सर्व नेत्यांना एकत्रित करुन जिल्हा आणि तालुकास्तरावर मेळावे घेतले. या मेळाव्यांच्या माध्यमातून महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडले गेले. गावनिहाय बैठकांमधून मतदारांसमोर डॉ. विखे पाटील यांनी मतदारांपर्यंत पोहचून निवडणुकीतील आपली भूमिका मांडली. प्रचाराच्या तिसऱ्या टप्यात गावोगावी पदयात्रा काढून त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते, जि. प. सदाशिव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पदयात्रेत महायुतीतील घटक पक्षांचे सर्व कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेच्या माध्यमातून डॉ. विखे पाटील यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक, युवक कार्यकर्ते, महिलांशी डॉ. विखे पाटील यांनी संवाद साधला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.