व्हॉटस्‌ ॲपवरून डॉ. विखेंची बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार

नगर: नगर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात समाज माध्यमांमध्ये अहमदनगर दक्षिण मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ या शिर्षकाखाली व्यगंचित्र काढुन प्रसिध्द केल्याचे कारणाने गुड्डु खताळ अथवा मुळ प्रसारक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

हे व्यंगचित्र प्रसारीत करणाऱ्याला डॉ.विखे पाटील यांची वैद्यकीय क्षेत्रातील पदवी व ते न्युरोसर्जन असल्याबाबत माहिती असतानाही, त्यांनी जनसामान्यांसमोर व मतदारासमोर खोटी प्रतिमा उभी केली आहे. मुद्दाहुन बदनामी करण्याच्या विशुध्द हेतूने डॉ. विखे पाटील हे बोगस व्यक्तिमत्व आहे,असे दाखविण्याचा व मतदारांच्या मनात व्देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मतदारांची मते कलुशित होवुन त्याचा विपरीत परिणाम मतदानावर व निवडणुक निकालावर व्हावा,अशा वाईट हेतूने हे व्यंगचित्र प्रसारीत करण्यात आले आहे. कोणताही कायदेशिर हक्क व अधिकार नसताना त्यांनी निवडणूक काळात अशा प्रकारचे बदनामीकारक व्यंगचित्र प्रसारीत करुन उमेदवाराची मानहानी केल्याच्या कारणाने त्यांच्या विरोधात निवडणूक विषयक कायदे व भारतीय दंडविधान आचारसंहितेतील तरतुदीनुसार योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

या संदर्भात उमेदवारांचे प्रतिनिधी डॉ.अभिजीत दिवटे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. डॉ. विखे पाटील हे डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखाना, मुळा प्रवरा को ऑपरेटीव्ह सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. डॉ.विखे पाटील फौंडेशन विळदघाट या शैक्षणिक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विश्‍वस्त म्हणून कार्यरत आहेत. दि. 11 एप्रिल 2019 रोजी व्हाट्‌ऍप नंबर 9975616161 यावरुन अहमदनगर दक्षिण मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ या शिर्षकाखाली व्यगंचित्र काढुन प्रसिध्द केले आहे. चित्रपटात मेडीकलची पदवी नसलेला बोगस डॉक्‍टर दाखविलेला आहे. त्याचा आधार घेवून गुड्डु खताळ अथवा मुळ प्रसारक यांनी डॉ.विखे पाटील यांची प्रतिमा बोगस डॉक्‍टर म्हणून दाखविली असल्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.