राज ठाकरे यांची स्क्रिप्ट शरद पवार यांच्या कडूनच – विनोद तावडे

मुंबई – सोलापूर आणि नांदेड मधील आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देत, राज ठाकरे यांची स्क्रिप्ट शरद पवार यांच्या कडूनच येत असल्याचे सांगितले. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतरच ते भाषण करत असल्याचे विनोद तावडे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरेंच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकीज असल्याचे सांगत, काल सोलापूरमध्ये शो होता, तर आज कोल्हापूर मध्ये शो आहे, अशा शब्दात तावडे यांनी राज ठाकरे त्यांच्यवर निशाणा साधला. तसेच आता राज ठाकरे यांनी ते कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत ते जाहीर करावे,असा टोला देखील विनोद तावडे यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्या आरोपावर उत्तर देत, जर आमच्या सर्वच योजना या फसलेल्या असत्या तर भारतीय जनता पक्षाचा पंचायत, ग्रामपंचायत, जिल्हापरिषदा आणि महानगरपालिका येथे विजय झाला नसता, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र संपत चालली असल्याचे विनोद तावडे यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.