सर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडणारा खासदार हवा -डॉ. सुजय विखे

कर्जत: संसदेत आपल्या भागाचे प्रश्‍न इंग्रजीतून मांडावे लागतात. त्यामुळे समोरच्या उमेदवाराची व माझी तुलना करा. तुम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडणारा खासदार हवा की निवडणुकीपुरता मतदान मागणारा खासदार हवा? असा प्रश्‍न महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राशीन येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. डॉ. विखे पुढे म्हणाले, विरोधकात आता मेळ राहिला नाही. ही निवडणूक जनतेची आहे. चुकीचे बटण दाबले की तुमचे टेंशन सुरू होईल. त्यामुळे मला निवडून द्या. डॉ. विखे पाटील व ना. शिंदे यांनी सोमवारी कर्जत तालुका दौरा केला. कर्जत, सिद्धटेक, राशीन, बेर्डी, दुरगाव आदी ठिकाणी मतदारांशी संवाद साधला. सिद्धटेक येथे सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. दुरगाव येथे पालकमंत्री प्रा.राम शिंदे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, अंकुशराव यादव, धनराज कोपनर, दादासाहेब सोनमाळी, स्वप्नील देसाई, माणिकराव जायभाय, सतिष पाटील, विजय पावणे, ज्ञानदेव लष्कर, गणेश पालवे उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात

दुरगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये माणिकराव जायभाय, शशिकांत निंबाळकर, वसंत निंबाळकर, भाऊसाहेब भगत, दत्ता शिंदे, शांतीलाल जायभाय, बाळासाहेब निंबाळकर, संतोष जायभाय, अनिल जायभाय, दीपक जायभाय, महेश भगत, अनिल कुलथे, आबा कुलथे, बाळासाहेब थोरात, मंगेश थोरात शंकर भगत, शहादेव जायभाय, भैरवनाथ जायभाय, अशोक भगत आदींचा यात समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.