नगर, (प्रतिनिधी) – टिळक रोड वरील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयातील निवासी विद्यार्थी यांच्या करिता भोजनाची व्यवस्था करत त्याच्या समवेत डाक कर्मचारी यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.
जयंती उत्सवाचा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीदिनी मुख्य डाकघराच्या पासपोर्ट हॉलमध्ये प्रतिमापूजन, बौद्धाचार्य राहुल कांबळे, लक्ष्मण माघाडे, गौतम पाचारणे, आदिनाथ ठोबे यांचे प्रमूख उपस्थितीत त्रिशरण पंचशील वंदना म्हणत अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव, सहायक अधीक्षक संदीप हदगल, दीपक कुंभारे, सतिष येवले, महेश तामटे, कमलेश मिरगणे, संदीप कोकाटे, सागर कलगुंडे, प्रफुल्ल काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
टिळकरोड वरील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयातील निवासी विद्यार्थी यांचे करिता दुपारच्या भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.जयंतीच्या पूर्वसंध्येला अहमदनगर प्रधान डाकघरामध्ये डॉ. अतुल मडावी यांच्याद्वारे डाक कर्मचारी यांचेसह कुटुंबियाकरिता दंततपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये कर्मचारी यांनी सहभाग घेत दंत तपासणी करून घेतली.