मुंबई – आज (१४ एप्रिल) संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. अशात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. यामध्येच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून गौरव मोरे ओळखला जातो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो खऱ्या अर्थाने नावरुपाला आला. गौरवने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं असून ‘हवाहवाई’ या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता.
दरम्यान, सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौरवने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याला दिलेलं कॅप्शन साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. “आपण आहोत, कारण ते होते…बाबासाहेब धन्यवाद,” असं कॅप्शन गौरवने या फोटाला दिलं आहे.