मुंबई – रोज सर्वांना मनमोकळेपणाने हसवणारा आणि दिलखुलास कॉमेडी करणारा स्टार म्हणून सध्या गौरव मोरेची ओळख आहे. गौरव कॉमेडी शोजसह चित्रपटांमध्ये देखील काम करतो. मराठीसह हिंदीमध्ये देखील त्याने आपला अभिनय अनेकदा सिद्ध केला आहे. मात्र सध्या गौरव मोरे चर्चेत आला आहे तो एका वेगळ्याच कारणामुळे.
महाराष्ट्राची हास्य जत्रामधून गौरव सुट्ट्या घेऊन थेट लंडनला गेला असल्याचं समजत. यावेळेसचा त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये तो मुंबई विमानतळावरून जाताना दिसतो. गौरव नेमकं लंडनला कशासाठी गेला हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र त्याने स्वतः सोशल मीडियावर लंडनला जात असल्याची पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
गौरवाची ही दुसरी लंडनवारी आहे. यापूर्वी देखील तो भारत जाधव यांच्यासोबत शूटिंगसाठी लंडनला गेला होता. यावेळी गौरवाने आपला एक फोटो शेअर करत ‘लंडन कॉलिंग’ असं कॅप्शन देत चाहत्यांना आपल्या प्रवासाची माहिती दिली आहे. मात्र कशासाठी परदेशवारी करत आहे हे त्याने पोस्टमध्ये उघड केलेलं नाही.
चाहते गौरवला या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. तर अनेकजण कशाचं शूट आहे ? असं देखील गौरवला विचारत आहेत.आपल्या कॉमेडीच्या जीवावर गौरव घराघरात पोहचला.‘हवाहवाई’ या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता.तर बॉलिवूडमधील ‘संजू’ या चित्रपटात त्याने थोड्या वेळाची पन लक्षवेधी भूमिका साकारली होती.