नवी दिल्ली: देशातील करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना उपचारांची नवीन गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या. या आधी करोना उपचारासाठी जे उपाय केले जात होते, जी औषधे दिली जात होती ती काढून टाकण्यात आहेत . महत्वाचे म्हणजे वाफ घेणे, व्हिटॅमिनची गोळी खाणे या सर्व गोष्टी यातून वगळण्यात आल्या आहेत.
करोना रुग्णांना आधी या गोष्टी घेण्याचे सल्ले दिले जात होते. परंतू आता नव्या गाईडलाईननुसार करोनाबाधितांना हे न करण्याचा सल्ला दिला जाणार आहे.
वाचा केंद्राच्या नव्या गाईडलाईन
- वाफ घ्यायची नाही.
* कोणतेही अँटीबायोटीक घ्यायचे नाही.
* कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकची गोळी घ्यायची नाही.
* आयव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाही.
* Doxycycline, hydroxychloroquine चा वापर करायचा नाही.
* ताप आल्यावरच फक्त पॅरॅसिटॅमोल गोळी घ्यायची आहे, अन्यथा नाही.
ऑक्सिजन आणि स्टेरॉईंडचा वापर योग्य प्रकारे केला जावा. करोनाच्या पहिल्या लाटेत करोना रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती. यात पुन्हा करोना रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली आहे.