वाशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टिकटॉक ऍप बंद करणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, करोना पसरवणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी लोकप्रिय चायनिज ऍस टिकटॉकवर बंदी घालण्याबाबत विचार केला जात आहे.
एका टीव्ही मुलाखती दरम्यान ट्रम्प यांना टिकटॉक ऍप बंदी विषयी विचारले असता, आपण यावर विचार करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. चीनमुळे आज सर्व जगाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे.
अमेरिकेत करोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असून मृत्यू झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. यासगळ्यास चीन जबाबदार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, करोना परिस्थिती ट्रम्प यांना योग्य पद्धतीने हाताळता आली नाही, असाही विरोधी सूर ट्रम्प यांच्या विषयी आहे. ट्रम्प यांच्या अगोदर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेओ आणि इतर सीनेटर्सनी टिकटॉक ऍपवर बंदी घातली जावी, असे म्हटले आहे.