मुंबई – उत्तर प्रदेशातील लोहिया नगर गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. हिंदू संघटनांसाठी काम केल्यामुळे त्यांना ही धमकी मिळाली आहे. याबाबत डॉक्टरांनी सिहानी गेट कोतवाली येथे तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यावर लोहिया नगरच्या आंबेडकर कॉलनीत राहणारे पीडित डॉ. अरविंद वत्स यांनी तक्रारीत सांगितले की, ‘लोहिया नगर चौकीजवळ त्यांचे क्लिनिक आहे, तेथे तो सुमारे २४ वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे. याशिवाय ते हिंदू संघटनांशीही संबंधित आहेत. ते हिंदू स्वाभिमान मंचचे यूपी आणि बिहार राज्याचे प्रभारीही आहेत. ते पुढे म्हणाले की, आरोपीने व्हॉट्सअॅप नंबरवर अनेक वेळा कॉल केला आहे. तसेच 1 सप्टेंबरच्या रात्री मला पहिल्यांदा फोन केला होता, पण हा कॉल उचलला नाही.’
ते म्हणाले,’दुसऱ्या दिवशी सकाळी परत फोन आला असता आरोपीने उचलला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 सप्टेंबर रोजी सकाळी आरोपीने तिसऱ्यांदा फोन करून धमकी दिली. एवढेच नाही तर आरोपीने २४ सप्टेंबर रोजी चौथ्यांदा फोन करून धमकी दिली होती.’
डॉक्टर वत्स यांनी सांगितले की, ‘आरोपीने थेट माझे नाव घेऊन म्हटला,’तू अनेक हिंदू संघटनांसाठी काम करतो, त्यामुळे तूला जीवे मारले जाईल. तुला कोणीही वाचवू शकणार नाही.” हा कॉल सुमारे पाच मिनिटे चालला. यादरम्यान आरोपीने मला अनेकवेळा धमक्या दिल्या.