रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या ‘ब्रोकोली’चे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

‘ब्रोकोली’ ही तशी लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना या भाजीबद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली गुणांचा खजिना आहे. यामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी अजून इतर अनेक पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात आढळतात. जे शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवतात. 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘ब्रोकोली’मुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. सध्याच्या करोना संकटकाळात ही भाजी खाणे नक्कीच फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना ब्रोकोलीमधील गुणांबद्दल पुरेशी माहिती नाही. चला तर मग ‘ब्रोकोली’मधील गुणांची माहिती घेऊ या..

‘ब्रोकोली’ दिसायला फुलकोबी (फ्लावर) सारखी असते. ब्रोकोलीची आपण कोशिंबीर, सूप किंवा भाजी बनवू शकता. बरेच जण ही भाजी उकडून खातात.

‘ब्रोकोली’ खाण्याचे फायदे :

  • हृदयरोग रोखण्यासाठी – ब्रोकोलीमध्ये केराटिनॉइड्स ल्युटीन आढळते. हे रक्त वाहिन्यांना निरोगी ठेवते. ब्रोकोलीचे नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका आणि इतर रोगांचा धोका कमी होतो. यामधील पोटॅशियम कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू देत नाही.
  • कर्करोग होण्याची शक्यता कमी करते – ब्रोकोलीचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोकाही कमी होतो. यात फायब्रोकेमिकल्स आढळतात. ब्रोकोलीमध्ये असलेले घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात.
  • उदासीनतेचा धोका टळतो – ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फॉलेट आढळते. जे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.
  • प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त – यात व्हिटॅमिन सी आढळतो. व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि कुठलेही प्रकारांचे संसर्ग रोखण्यास मदत करते.
  • गरोदरपणात सेवन करणे फायदेशीर – गरोदर महिलांनी नियमित ब्रोकोलीचे सेवन करावे. यात असलेले लोह, फोलेट हे घटक बाळांच्या आरोग्य आणि विकासासाठी फायदेशीर असून आईस अनेक प्रकारच्या संक्रमणापासून लांब ठेवता येते.
  • वजन कमी करण्यास उपयुक्त – ब्रोकोलीत मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रथिने असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचे सेवन उपयुक्त ठरते.
  • नेत्रविकारांवर फायदेशीर – ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे, त्यांनी ब्रोकोली खाल्ल्याने खूप फायदा होतो. ब्रोकोलीतील बीटा कॅरोटीन आणि अँटी ऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.