नवी दिल्ली : कर्नाटक कॉंग्रेसचे संकटमोचक डिके शिवकुमार यांच्या इडी कोठडीत 17 सप्टेंबरपर्यंत शिवकुमार यांच्या वाढ करण्यास न्यायालयाने मान्यता दिली.
मनीॅ लॉंड्रिंग प्रकरणात शिवकुमार यांना इडीने अटक केली आहे. त्यांच्या कोठडीची मुदत आज संपत होती. इडीच्या वकिलांनी सांगितले की, चौकशीत शिवकुमार हे परस्पर विरोधी माहिती देत आहेत. त्यामुळे तपासात अडथळे येत असल्याने त्यांच्या इडी कोठडीत वाढ करावी.
शिवकुमार यांच्या वकीलांनी त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव जामीन द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी न्यायालयाने त्यांना हव्या त्या वैद्यकीय सुविधा आधी पुरवाव्यात त्यानंतर त्यांची चौकशी करावी. प्रकृती आधी हे लक्षात घ्या, असे आदेश न्यायालयाने स्पष्ट केले. त्याच बरोबर त्यांना 17 सप्टेंबर पर्यंत इडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.