आंबेठाण-वराळे (ता. खेड) येथे ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय यांचे उद्घाटन आणि महाळूगे वराळे रस्त्याचे भूमिपूजन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषद गटनेते शरद बुट्टेपाटील, दिलीप मेदगे, संजय तेली, पांडुरंग ठाकुर, अतुल देशमुख, कालिदास वाडेकर, राजन परदेशी, चांगदेव शिवेकर, रामदास मेदनकर, गणेश भेगडे, दिलीप वाळके, प्रांत संजय तेली आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शरद बुट्टे पाटील म्हणाले, पालकमंत्री असताना गिरीष बापट यांनी खेड तालुक्यात जो 58 कोटी निधी उपलब्ध करून दिला त्यापैकी 40 कोटी रुपये पिंपरी-पाईट गटाला दिले. त्यामुळे सर्व बॅकलॉग भरून निघाला.
बापट म्हणाले, आत्तापर्यंत 5 वर्षात 450 गावं भेट दिली. ग्रामीण भागात लंडन, अमेरिकेसारख्या शाळा करणे हे ध्येय ठेवले आहे. पुणे जिल्ह्यात केंद्र सरकारचा जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जिल्ह्यातील गावे व्यसनमुक्त झाली पाहिजेत. महाळुंगे-वराळे हा रस्ता जिल्हा नियोजनकडून मी मंजूर करून घेतला आहे. सूत्रसंचालन शेटे सर यांनी केले. ग्रामसेवक मिंड यांनी आभार मानले.