दुबई : सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने दुबई टेनिस अंजिक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचेया पुरूष एकेरीमध्ये अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचने ग्रीसच्या स्टेफानोस सिसिपासचा ६-३, ६-४ असा पराभव करत विजय नोंदविला.
And the 2020 @DDFTennis champion is @DjokerNole as he defeats Stefanos Tsitsipas 6-3 6-4 to win his 2nd Dubai trophy and 1st since 2013. That's 18 straight wins this season for the world No.1
— Dubai Tennis Champs (@DDFTennis) February 29, 2020
जोकोवीचने पाचव्यांदा दुबई टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीतील हे ७९ वे विजेतेपद ठरले.
दरम्यान, याआधी जोकोविचने उपांत्य फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या गेल माँफिलिसचा २-६,७-६ (१०-८), ६-१ असा पराभव करत अतिंम फेरीत धडक मारली होती. तर, उपांत्यपूर्व फेरीत त्याने कारेन काचनोव याचा ६-२, ६-२ असा पराभव करत आगेकूच केली होती.