मुंबई – तेलगू सुपरस्टार ‘नंदामुरी बालकृष्ण’ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी हैदराबादच्या केअर हॉस्पिटलमध्ये नंदामुरी यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
नंदामुरी यांना 31 ऑक्टोबर रोजी खांद्यामध्ये दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा महिन्यांपासून त्याला हा त्रास होता. मात्र, आता शस्त्रक्रिये नंतर त्यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारली असून, सध्या नंदामुरी आपल्या घरी आहेत.
खांद्याचे शल्यचिकित्सक डॉ. रघुवीर रेड्डी आणि डॉ. बीएन प्रसाद यांनी नंदामुरी यांच्यावर 4 तासांची शस्त्रक्रिया केली. नंदामुरी यांचे चाहते अभिनेत्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.