मुंबई – आशा स्वयंसेविकांना ठाकरे सरकारकडून मोठी भेट देण्यात येणार आहे. 2 हजार आणि 3 हजार रूपये एवढा वाढीव मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील सुमारे 70 हजार आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदला मिळणार असल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची दिवाळी होणार गोड. जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी ५६ लाख रुपये वितरित. शासन निर्णय निर्गमित- आरोग्य मंत्री @rajeshtope11 यांची माहिती pic.twitter.com/qKZpx4fZsI
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 3, 2020
राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची दिवाळी गोड होणार आहे. जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी 57 कोटी 56 लाख रूपये वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.