Isha Koppikar : अभिनेत्री ईशा कोप्पीकरने (Isha Koppikar) ‘एक था दिल एक थी धडकन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. मात्र सध्या ईशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. ईशानं 14 वर्षे संसार केल्यानंतर लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे. ईशानं व्यावसायिक टिमी नारंग उर्फ रोहित याच्याशी लग्न केलं होतं. आता दोघांनी घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ईशा आणि टिमी नारंग यांचा नोव्हेंबर महिन्यातच घटस्फोट झालाय. तिनं मुलीला सोबत घेऊन टिमी नारंगचं घर सोडलं आहे. दोघांनी लग्न वाचवण्यासाठी, मुलीसाठी एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केले; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. दोघांना 8 वर्षांची रियाना नावाची मुलगीही आहे. तिनं व्यावसायिक टिमी नारंगशी 2009 मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाला 14 वर्ष झाली होती. ईशा आणि टिम्मी यांनी 3 वर्षे एकमेकांना डेट केले. 2009 मध्ये दोघांनीही लग्न केले. त्यानंतर अभिनेत्रींनी करिअर सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
ईशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, 1995 मध्ये ईशानं मिस इंडिया स्पर्धेचं विजेतेपद पटकवले होते. 2000 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. अभिनेता हृतिक रोशनच्या फिजा सिनेमात तिने काम केलं होतं. ईशानं अनेक सिनेमांमध्ये आयटम साँग केले . त्यातही तिचं ‘खल्लास’ आजही लोकप्रिय आहे. तिला ‘खल्लास’ गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. याशिवाय तिने तेलगू, तमिळ सिनेमांमध्ये काम केले आहे. ईशा कोप्पीकरने कृष्णा कॉटेज, डॉन, 36 चायना टाऊन, क्या कूल है हम, एलओसी कारगिल यासारख्या सुपरहिट बाॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.