कुरकुंभ -सीएसटीपीएल फाउंडेशनच्या वतीने दौंड तालुक्यात सुमारे अडीचशे तर पुणे महानगरपालिकेत एक हजार पीपीई किटचे वाटप केल्याची माहिती सीएसटीपीएल फाउंडेशनचे संचालक कृष्णकुमार बुब यांनी दिली. दौंड तालुक्यात सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक अहोरात्र झटत आहेत.
सीएसटीपीएलच्या पुढाकाराने पीपीई किटचे वाटप केले आहे. किटमध्ये फेस शिल्ड, गॉगल, मास्क, लोवर, सॉक्स साहित्य आहे. कुरकुंभ, पांढरेवाडी, गिरीम, रोटी, कुसेगाव, जिरेगाव, मळद, खडकी, स्वामी चिंचोली, गोपाळवाडी, लिंगाळी, वरवंड आदी 30 ग्रामपंचायतींना 100 लिटर सोडियम हायपोक्लोराईडचा पुरवठा केला होता.