पाथर्डी -शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्ताने व करोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील क्रिस्टल हॉस्पिटलच्यावतीने श्री मोहटादेवी गडावर जगदंबादेवी देवस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, मोहटेचे विश्वस्त तथा नगर येथील क्रिस्टल हॉस्पिटलचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांचे हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री. लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीधर देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक करीत जनसामान्यांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी दादा तळेकर, विश्वस्त अशोक दहिफळे, आजीनाथ आव्हाड, भीमराव पालवे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.मढीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी तर गणेश फसले यांनी आभार मानले.