पुणे: महाराष्ट्र बॅंकेकडून अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट कंपनीला वित्त पुरवठा मंजुरी देण्यात आली. यावेळी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव, कार्यकारी संचालक हेमंत टम्टा व नागेश्वर राव वाय, महाप्रबंधक संजय रूद्र, महाप्रबंधक व पुणे शहर विभागाचे विभागीय व्यवस्थापक व्ही. पी. श्रीवास्तव उपस्थित होते.
या द्वारा बॅंकेने एका आयात पर्यायी प्रकल्पाला मदत केली आहे. थ्रस्ट एअरक्राफ्टद्वारे विमान व हवाई वाहतूक क्षेत्रात उत्पादन, संशोधन, डिझाईन आणि तंत्रज्ञान सेवा पुरवल्या जातात. यादव यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असे 6 व्यक्तींसाठीचे विमान बनविले आहे. मेड इन इंडिया विमान बनवणारी भारतातील ही पहिली कंपनी आहे.