रेडा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, इंदापूर तालुका व सीवायडीए, तसेच शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील दगडेवस्ती-रामकुंड येथे जिल्हा बंदीमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश येथील शेकडो ऊसतोड मजुरांना, तसेच सराफवाडी गावातील मजूर, गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्याचे वाटप व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व पोलीस वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक शंकर मुठेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ऊसतोड मजुरांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन सूचना इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोठेकर यांनी दिल्या.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, तसेच प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य व जीवनावश्यक वस्तूचे किट मोफत देण्यात येत आहे.