शेटफळगढे – येथे सोनाई प्रतिष्ठानच्यावतीने माजी सभापती प्रवीण माने यांच्याहस्ते 100 अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. प्रत्येक अडचणींना जनसामान्यांच्या सोबत सदैव उभे राहत आपलं सोनाई प्रतिष्ठान सदैव कार्यरत असते.
जागतिक आपत्ती ठरलेल्या करोनासारख्या महामारीच्या प्रादुर्भावातही आपले समाजसेवेचे व्रत प्रतिष्ठानने जोपासले आहे. देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
येथील श्रमजीवी बांधवांचा अर्थिक कणा मात्र यामुळे डळमळीत झाला आहे. अशा समाज बांधवांना मदत म्हणून येथील नागरिकांना अन्नधान्याच्या 100 किटचे वाटप करण्यात आले.