कोलंबो – श्रीलंकेतील राजपक्षे सरकारच्या चीन धार्जिण्या निर्णयांवरू त्या देशात असंतोषाचे वातावरण आहे. चीनच्या एका प्रोजेक्टमुळे अख्खी श्रीलंका धूमसत आहे. लोक बंडाच्या तयारीत असल्याचे निदर्शनास येते आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोत चीन पोर्ट सिटी बनवत आहे.
ह्या पोर्ट सिटीच्याविरोधात डझनभर याचिका दाखल करण्यात आल्यात. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये श्रीलंकेतला विरोधी पक्ष, सिव्हिल सोसायटीज, कामगार संघटनांचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या राजपक्षे सरकारने संसदेत कोलंबो पोर्ट सिटी इकॉनॉमिक कमीशन नावाचं विधेयक सादर केलं आहे. या विधेयकानुसार राजधानी कोलंबोच्या समुद्रतटावर 1.4 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 10 हजार कोटी रुपये खर्च करुन पोर्ट सिटी वसवण्याचा प्रस्ताव आहे.
श्रीलंकेच्या लोकांचे म्हणणे आहे की, हे विधेयक म्हणजे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे आणि हा सरळ सरळ देश विकण्याचा प्रयत्न आहे.