दिवे – दिवे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत काळेवाडी येथे एक नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळून आला आहे. संबंधित व्यक्ती आठ दिवसांपूर्वी पुणे येथील एका व्यापाऱ्याच्या संपर्कात आला होता. त्यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता; परंतु मंगळवारी (दि. 4) दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.