Disha Patani – अभिनेत्री ‘दिशा पटानी’ (Disha Patani) ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात. मात्र, आता दिशा पटानीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
दिशा पटानी हिचा एका मोठ्या चित्रपटामधून पत्ता कट करण्यात आलाय. फक्त हेच नाही तर थेट निर्मात्यांनी नव्या अभिनेत्रीचा शोध देखील सुरू केलाय. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या कर्ण चित्रपटात दिशा पटानी मुख्य भूमिकेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तिचा आता पत्ता कट झाला असून निर्माते दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे सांगितले गेले.