नगर -जिल्ह्यातील आणखी तीन रुग्ण आज करोनामुक्त होऊन घरी परतले. या तीन रुग्णांना आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली 73 झाली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 32 वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील 24 वर्षीय युवक आणि अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील 56 वर्षीय व्यक्ती करोनातून बरे झाले. यावेळी बूथ हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी त्यांना निरोप दिला.जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण बरे होत असून, नागरिकांनी मुळात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.