पुणे – खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दिवसभर अल्पसा पाऊस झाला. दिवसभरात खडकवासला-7, पानशेत-1, वरसगाव-0 आणि टेमघर धरणक्षेत्रात 2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
सद्यस्थितीत पानशेत धरणाच्या पॉवर हाऊसमधून 600 क्युसेक, वरसगाव धरणातून 1 हजार 800 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून 95.45 टक्के पाणीसाठा आहे. सध्या खडकवासला धरण 76.37 टक्के तर टेमघर धरण 76.77 टक्के इतके भरले आहे. तर पानशेत आणि वरसगाव ही मोठी धरणे 100 टक्के भरली आहेत. खडकवासला धरणाच्या कालव्यातून 1 हजार 54 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
खडकवासला धरणात 1.51 टीएमसी पाणीसाठा आहे. तर पानशेत धरणात 10.65 टीएमसी, वरसगावमध्ये 12.82 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर टेमघर धरणात 2.85 टीएमसी म्हणजे 76.77 टक्के पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 27.82 टीएमसी म्हणजे 95.45 टक्के पाणीसाठा आहे.