मंचर, (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व आंबेगाव तहसील कार्यालय यांच्या वतीने आंबेगाव तालुका पोलीस पाटील यांचे आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रशिक्षण शिबिर घोडेगाव येथील भिमाशंकर अॅग्रो टुरिझम येथे पार पडले.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे व निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या आदेशावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशदाचे प्रशिक्षक लखन गायकवाड, ए. के. महाजन, अक्षय चव्हाण, जयेश अहिरे, नायब तहसीलदार ए. बी. गवारी यांनी मार्गदर्शन प्रात्याक्षिके करून दाखवली.
आपत्ती म्हणजे काय ? तिचे व्यवस्थापन, आपत्ती प्रकार ओळखणे, योग्य संदेश, मदतकार्य, स्वतःची सुरक्षा करून मदतकार्य करणे, धोका ओळखणे, गाव आराखडा तयार करणे, प्रथमोपचार, अपघाती व्यक्ती उचलणे, सर्पदंश, विषबाधा, उलटी, कृत्रिम श्वासोच्छवास, दोर बांधणे, रस्ता सुरक्षा चिन्हे ओळखणे,
आग विझवणे, गॅस गळती, निसर्गाचे संकेत, अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, वीज अपघात, तात्काळ संदेश देणारे नंबर, रुग्नांचे मनोबल वाढवणे, अपघात स्थळी मदतीचे आवाहन करणे आदी आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत माहिती प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात आली.
कार्यकमास विविध गावचे पोलीस पाटील उपस्थित होते. पोलीस पाटील विजय केंगले, अनिता वाजे, प्रभाकर दाभाडे, जमुना शेळके, विठ्ठल वळसे पाटील, गणेश हुले आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुहास आवटे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम वाघमारे यांनी आभार मानले.