गंदी बात फेम गहना वशिष्ठने केला राज कुंद्राला सपोर्ट म्हणाली,’पूनम पांडे कित्येक वर्षांपासून MMS व्हिडीओ बनवते

मुंबई -अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वादग्रस्त पती राज कुंद्रा याला पोलिसांनी अटक केली. अश्‍लील चित्रपटांच्या निर्मितीच्या व्यवसायात गुंतला असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अगोदरच चार जणांना अटक झाली होती. राजच्या अटकेनंतर आणखी एकाला पकडण्यात आले आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर धक्‍कादायक खुलासे समोर येत आहेत. महाराष्ट्र सायबर सेलमधील सुत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोपडा आणि मॉडेल पूनम पांडे यांचंही नाव आरोपी म्हणून समोर आलं होतं. या दोघांचाही जबाब महाराष्ट्र सायबर सेलनं नोंदवून घेतला आहे. दोघिंनीही राज कुंद्राविरोधात आरोप केल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पूनम पांडेने राज कुंद्रावर आरोप केल्यानंतर तिला मोबाईल नंबर लीक करणार  तसेच  अपमानास्पद आणि धमकीचे मेसेज येत  आहे तिच्या आरोपाला अभिनेत्री गहना वशिष्ठने खोटे ठरवले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gehana Vasisth (@gehana_vasisth)

 गहना वशिष्ठने पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचा बचाव केला आहे.  तिने हिंदुस्तान टाईम्सला बोलतांना म्हंटले आहे की,’ पूनम पांडे हि सोशलवर नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते. काही फोटोत ती तिच्या पतीसह दिसून येते. तिने शेअर केलेल्या फोटोत ती तिचे खाजगी भाग दाखवते.’ सोशलवर फोटो शेअर करण्यासाठी तिला राज सांगते का? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gehana Vasisth (@gehana_vasisth)

 गहना वशिष्ठ पुढे म्हणाली,’ पूनमने २०११ मध्ये असे म्हणले होते कि भारत जिंकल्यास मी मैदानात नग्न होईल. आणि ती सोशलवर सुद्धा बऱ्याच वर्षा पासून अॅ्डल्ट फोटो व्हिडियो शेअर करते. राज यांनी आपली कंपनी सुरू करण्यापूर्वीच ती असे व्हिडिओ बनवायची.  पांडे कुंद्राच्या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. ”असे  म्हणत  गहनाने राज कुंद्राला सपोर्ट केला आहे.

तत्पूर्वी, बॉलीवूड गायक मिका सिंग, राखी सावंत यांनीही राज कुंद्रा हा भला माणूस म्हणत त्याला पाठींबा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gehana Vasisth (@gehana_vasisth)

त्या मुलींचा घेतला गैरफायदा
दरम्यान,  असे म्हणतात रोज हजारो तरुण आणि तरुणी नायक किंवा नायिका होण्याचे स्वप्न घेऊन मुंबई या मायानगरीत दाखल होतात, तर त्यातले 80 टक्‍के लोक कुठेच काही काम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर परतही जातात. मात्र, काही जण संघर्ष करत राहतात. ते विविध नायक-नायिका, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार यांची दारे ठोठावतात. त्यातून एखाद्याचे नशीब फळफळते. अन्य जण मात्र फुटकळ भूमिकांत समाधानी होत संघर्ष करत राहतात तर काही मुली मात्र चुकीच्या लोकांच्या जाळ्यात अडकतात.

राज कुंद्राच्या या काळ्या धंद्यात अशाच नायिका होण्यासाठी मुंबईत आलेल्या मुली अडकल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्या मुलींना मोठ्या चित्रपटांत काम देण्याचे आमिष दाखवत प्रत्यक्षात अश्‍लील चित्रपटांच्या या दलदलीत त्यांना लोटण्यात आले. दर आठवड्याला एक चित्रपट अशा वेगाने या चित्रपटांची निर्मिती केली जात होती, अशी माहितीही समोर आली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.