नवी दिल्ली – एकीकडे विकासदर वाढत असतानाच प्रत्यक्ष कर संकलनातून सरकारला मिळालेला महसूल मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार 17 मार्चपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन 20 टक्क्यांनी वाढून 18.90 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. (Direct tax collection grows 20% to Rs 18.90 trillion till March 17)
अप्रत्यक्ष कर संकलनही वाढणार असल्यामुळे सरकारचा एकूण महसूल वाढून सरकारची तूट अपेक्षेइतकी कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. देशाच्या स्थूल अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही एक सकारात्मक घटना समजली जात असून याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकावर बुधवारी झाला.
केंद्र सरकारने करदात्याची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर कर भरणा सोपा केला आहे .त्यामुळे कर संकलन वाढत असल्याचे कर विभागाचे म्हणणे आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 17.03.2024 पर्यंत परताव्या पोटी रु. 3,36,808 कोटी इतकी रक्कम जारी आली. आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच कालावधीत परताव्या पोटी जारी करण्यात आलेल्या रु. 2,98,758 च्या तुलनेत यामध्ये 12.74% वृद्धी दिसून येत आहे.