नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत मंडपम येथे आयोजित स्टार्टअप महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी स्टार्टअपने आयोजित केलेली उत्पादने आणि नाविन्यपूर्ण प्रदर्शन पाहिले. मोदी म्हणाले की, भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप बाजारपेठ आहे, ज्याचे नेतृत्व आपल्या देशातील तरुण करत आहेत. (India has world’s third largest startup ecosystem: PM at Startup Mahakumbh)
आम्ही आता एआय तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या नवीन युगात आहोत. मोदी म्हणाले, मी एआयची खूप मदत घेतो, निवडणूक प्रचारात जेव्हा भाषेची अडचण येते, तेव्हा मी प्रत्येक भाषेत माझा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एआय0ची मदत घेतो.
संपूर्ण भारतातील नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आघाडीचे गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि आकांक्षी उद्योजकांचा सहभाग दिसला. या कार्यक्रमात 2000 हून अधिक स्टार्टअप्स, 1000 गुंतवणूकदार, 100 युनिकॉर्न, 300 इनक्यूबेटर, 10 देशाचे प्रतिनिधी, 3000 भावी उद्योजक आणि 50,000 व्यावसायिक सहभागी होत आहेत.
बिहार, राजस्थान, मेघालय, कर्नाटक आणि केरळसह राज्यांच्या समर्थनासह स्टार्टअप महाकुंभ दालनांमध्ये झरोधा आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड ) यांचा समावेश आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी ), झोमॅटो आणि भारतीय निर्यात पत हमी महामंडळ (ईसीजीसी ) यांच्या माध्यमातून समर्थित स्टार्टअप महाकुंभमध्ये उत्तर प्रदेश राज्य या कार्यक्रमासाठी राज्य भागीदार आहे.
या कार्यक्रमात भारताची आर्थिक वृद्धी आणि विकासामध्ये स्टार्टअप्सच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल प्रख्यात उद्योजक आणि धोरणकर्त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेची भावना जोपासण्यावर लक्ष केंद्रित करून, भावी उद्योजक दिनाला महाविद्यालयांनी निवडलेल्या सुमारे 3,000 व्यक्ती एकत्र येण्याची अपेक्षा आहे.
डीपटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअरद्वारे सेवा, आर्थिक तंत्रज्ञान (फिन्टेक), कृषी तंत्रज्ञान (ग्रीटेक), जैवतंत्रज्ञान (बायोटेक) आणि औषध उत्पादन , हवामान तंत्रज्ञान (क्लायमेट टेक), गेमिंग आणि ई-क्रीडा, आणि इनक्यूबेटर्सवर घटनांची विविधता आणि सखोलता दर्शवणारी दालने होती.
भारतीय स्टार्टअप्सचे भविष्य आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विचारप्रवर्तक चर्चा केली. या कार्यक्रमाने गुंतवणूकदार, उद्योजक आणि उद्योग व्यावसायिक यांच्यातील संपर्क वाढवण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या मंचाने स्टार्टअप आणि गुंतवणूकदार यांच्यातील मौलिक परस्परसंवाद आणि संभाव्य सहयोग सुलभ केला.