मुंबई – नववर्षाच्या निमित्ताने आणि करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करु नये, असे आवाहन ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
31 डिसेंबरला रात्री दारु पिऊन गाडी चालवू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मुंबई पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहे. त्यामुळे जर कोणी रस्त्यावर दारु पिऊन गाडी चालवली, तर त्याची थेट रुग्णालयात पाठवून ब्लड टेस्ट केली जाणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ब्रीथ एनालायझरने कोणत्याही चालकाची तपासणी केली जाणार नाही. पण जर पोलिसांना एखाद्यावर संशय आला, तर त्याची थेट रुग्णालयात रक्त तपासणी केली जाणार आहे. यावेळी जर त्याच्या रक्तात दारु आढळली तर त्या चालकासोबतच गाडीतील इतरांवरही कारवाई केली जाणार आहे.