श्री शंभुशौर्य दीपोत्सव : दिव्यांचा लखलखाट
वाघोली – छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या श्री शंभुशौर्य दीपोत्सव सोहळ्यामध्ये संपूर्ण समाधीस्थळ दिव्यांच्या लखलखाटांनी उजळून गेले होते. यावेळी समाधीस्थळावर जलाभिषेक व स्मारक पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
समितीच्या माध्यमातून समाधीस्थळी दीपोत्सव आयोजनाचे पाचवे वर्ष आहे. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला येसाजी कंक यांचे वंशज आकाशराजे कंक, धनाजी जाधव यांचे वंशज अमरसिंहराजे जाधवराव, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे वंशज सत्यशीलराजे दाभाडे, पद्मश्री मुरलीकांत पेटकर तुळापूर ग्रामस्थ, शंभुभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणारे नितीन नांदगावकर, आयएएस विशाल सोळंखी, मराठा मोर्चाचे विनोद पाटील, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील आनंद काळे, सुदर्शन चौधरी यांना शंभुगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे दत्तात्रय ढाणे, रमेश हरगुडे, आशा भट्ट, सुप्रिया शिंदे, संभाजी आरमार, गजराज ग्रुप, विचारमंच वालवड, शिवक्रांती हिंदवी सेना, निर्मल वारी, विथ सह्याद्री यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन सेवासमितीच्या वतीने करण्यात आले.