नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यापैकी एक डिजिटल चलन आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या वर्षी डिजिटल चलन लाँच करणार आहे. हे ब्लॉक चेनवर आधारित चलन असेल.
Digital rupee to be issued using blockchain and other technologies; to be issued by RBI starting 2022-23. This will give a big boost to the economy: FM Nirmala Sitharaman#Budget2022 pic.twitter.com/tUdj2DoZCR
— ANI (@ANI) February 1, 2022
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचताना सांगितले की, ब्लॉक चेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चलन जारी केले जाईल. ते 2022-23 च्या सुरुवातीला रिलीज होईल. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. असेही अर्थमंत्री म्हणाल्या आहेत.
अर्थमंत्री सीतारामन पुढे म्हणाल्या की, या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा पाया मिळेल. पुढील आर्थिक वर्षात आर्थिक वाढ (GDP) 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. चालू वर्षात भारताची आर्थिक वाढ 9.2% राहण्याचा अंदाज आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.