नवी दिल्ली – मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प असणार आहे.देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.यात सर्वसामान्य जनता, शेतकरी ते उद्योग विश्वाला मोठी मदत करण्यात आली आहे. शेतकरी वर्गालाही दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
आगामी काळात मोठ्या नोकऱ्या प्रमाणावर देणार असल्याचंही अर्थमंत्री यांनी यावेळी सांगितले. याचबरोबरसंरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी २५ टक्के बजेट. दरवर्षीप्रमाणे संरक्षण क्षेत्राला मोठी मदत करण्यात आली आहे.
68% of the capital procurement budget for Defence to be earmarked for domestic industry to promote Aatmanirbharta and reduce dependence on imports of defence equipment. This is up from the 58% last fiscal: FM Nirmala Sitharaman#Budget2022 pic.twitter.com/pQJm3ymlQE
— ANI (@ANI) February 1, 2022
टेलिकॉम बाबत काही महत्वाच्या गोष्टी
-टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या नोकऱ्या उपलब्ध करणार.
-गावागावत ब्रॉडबाँड सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार
-2022 मध्ये 5G सुविधा मिळणार.
-इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरी अदलाबदली धोरणावर भर देणार.
क्रिप्टो करन्सीबाबत सरकारचा मोठा निर्णय.
-क्रिप्टो करन्सीच्या कमाईवर ३० टक्के कर लागणार.
-अनेक दिवसांपासून देशात क्रिप्टो करन्सीच्याबाबत चर्चा सुरु होती.
-तरुणाई त्याकडे आकर्षीत होताना पाहायला मिळाली होती.
टॅक्स/GST
-जानेवारीत १ लाख ४० हजार कोटी GST जमा.
-कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर.
-कॉर्पोरेच टॅक्सचा सरचार्ज १२ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर.
-Income Tax Returns मधील सुसुत्रीकरणासाठी २ वर्षांचा कालावधी देण्यात आला
-आता १ कोटी ऐवजी १० कोटी रुपयांच्या कमाईवर कॉर्पोरेट टॅक्स लागणार.
-स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत कर सवलत देण्यात येणार.
The gross GST collections for the month of January 2022 are Rs 1,40,986 crores which is the highest since the inception of GST: Finance Minister Nirmala Sitharaman#Budget2022 pic.twitter.com/s5P7030KEw
— ANI (@ANI) February 1, 2022
विद्यार्थीनां मोठा दिलासा
-शाळेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनलची घोषणा.
-स्थानीक भाषांमध्ये विद्यार्थांना शिकवण्यासाठी प्राधान्य देणार.
-ई माहिती वर भर देऊन मुलांचं शिक्षण गतीशील करणार.
-डिजिटल विद्यापीठ तयार करणार.
उद्योग क्षेत्रासाठी मोठी घोषणा
-एकाच वेबसाईटवर येणार सर्व उद्योग.
-उद्योग धंदे सुरु करण्यासाठी अनेक जुन्या प्रक्रिया रद्द करणार.
-मध्यम आणि लघू उद्योगासाठी २ लाख कोटींचं अर्थसाहाय्य.
-रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूकीसाठी मोठी गुंतवणूक करणार.
-नाबार्डच्या माध्यमातून तरुणांना आर्थीक मदत करणार.
States will be encouraged to revise syllabi of agricultural universities to meet needs of natural, zero-budget & organic farming, modern-day agriculture: FM Nirmala Sitharaman #Budget2022 pic.twitter.com/sq9BG5tkU0
— ANI (@ANI) February 1, 2022
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक
-जलसिंचन योजनेतून ९ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार.
-शेतकऱ्यांकडून मोठी धान्य खरेदी करणार, रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार.
-तेलबियांच्या शेतीला प्राधान्य देणार.
-५ नदीजोड प्रकल्पांची ब्लू प्रिंट तयार.
Fund to be facilitated through NABARD to finance startups for agriculture and rural enterprise, relevant for farm produce value chain. Startups will support FPOs and provide tech to farmers: FM Nirmala Sitharaman #Budget2022 pic.twitter.com/bgzx65JBGW
— ANI (@ANI) February 1, 2022
अर्थमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे
-पायाभूत साठी 20 हजार कोटींचा निधी.
– 400 वंदे भारत ट्रेन सुरु करणार.
-3 वर्षात 400 बुलेट ट्रेन सुरु करणार.
-2047 पर्यंतची रुपरेखा यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. पायाभूत सुविधेसाठी मोठी गुंतवणूक करणार.