आळंदी – दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या वतीने पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा बापू बांगर यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत गुरुवारी (दि. 14) राजमाता जिजाऊ काॅलेज, डुडुळगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये अपघात, सायबर गुन्हे, महिला अत्याचार गुन्हे यासंदर्भात पीपीटी दाखवून जनजागृती करण्यात आली.
यावेळी दिघी-आळंदी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनकर व महिला पोलीस शिपाई तापकीर मॅडम यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, मागील आठवड्यात आळंदी येथील एमआयटी काॅलेजमध्ये हा उपक्रम घेण्यात आला होता.