India Women vs England Women Test (Mumbai) : महिला क्रिकेटमध्ये भारताने मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली. या दोन संघातील एकमेव कसोटी सामना येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिसमवर सुरु आहे. शुभा सतीश, जेमिमा रॉड्रीक्स, यस्तिका भाटीया, कर्णधार हरमनप्रीत कौर व दीप्ती शर्मा यांच्या सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर भारताच्या महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 7 गडी गमावून 410 धावांचा डोंगर उभारला आहे.
गुरुवारी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 गडी गमावून 410 धावा केल्या. यासह भारताने 88 वर्षांच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. भारताने प्रथमच कसोटीच्या पहिल्या दिवशी 400 हून अधिक धावा केल्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये हा पराक्रम दुसऱ्यांदा घडला आहे. इंग्लंडने 1935 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा ही कामगिरी केली होती.
𝗦𝘁𝘂𝗺𝗽𝘀!
Delightful day for #TeamIndia as the batters help reach 410/7 👌@Deepti_Sharma06 remains unbeaten on 60* 😎
Follow the match ▶️ https://t.co/UB89NFaqaJ#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/O3vpqJ7stA
— BCCI Women (@BCCIWomen) December 14, 2023
भारताच्या चार खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा संघासाठी सलामीला आल्या. यादरम्यान मंधाना 12 चेंडूत 17 धावा करून बाद झाली. शेफाली 30 चेंडूत 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर शुभा सतीश हिने चमकदार कामगिरी केली. तिने 13 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. शुभाने 76 चेंडूंचा सामना करत 69 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकावले. तिने 99 चेंडूत 68 धावा केल्या. यास्तिका भाटियानेही अर्धशतक झळकावले. तिने 88 चेंडूत 66 धावा केल्या.
कर्णधार हरमनप्रीत कौरचे मात्र अर्धशतक हुकले. तिने 81 चेंडूंचा सामना करत 49 धावा केल्या. हरमनप्रीतने 6 चौकार मारले. स्नेह राणा 30 धावा करून बाद झाली. तिने 73 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर या दोघी पहिल्या दिवशी नाबाद परतल्या आहेत. दिप्ती 95 चेंडूंचा सामना करताना 60 धावांवर तर पूजा वस्त्राकर 4 धावा करून नाबाद आहे.
INDW vs ENGW Test : शुभा सतीशने पदार्पणाच्या सामन्यातच स्मृती मानधनाचा ‘तो’ विक्रम काढला मोडीत….
भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजांना त्यांच्या आजीची आठवण करून दिली. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी दोन शतकी भागीदारी केल्या. जेमिमा आणि शुभा यांच्यात 115 धावांची भागीदारी झाली तर हरमनप्रीत आणि यास्तिक यांच्यामध्ये 116 धावांची भागीदारी झाली. स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांच्यात 92 धावांची भागीदारी झाली. भारताची सलामीची जोडी फार काळ मैदानावर टिकू शकली नाही. स्मृती आणि शफाली यांच्यात केवळ 25 धावांची भागीदारी झाली.
संक्षिप्त धावफलक – भारत महिला संघ पहिला डाव – 94 षटकांत 7 बाद 410 धावा. (हरमनप्रीत कौर 49, शुभा सतीश 69, जेमिमा रॉड्रीक्स68, यस्तिका भाटीया 66, स्नेह राणा 30, दीप्ती शर्मा खेळत आहे 60, पुजा वस्त्रकार खेळत आहे 4, लॉरेन बेल 2-64).