पालक
पालक ही बारा महिने सगळीकडे मिळणारी सर्वोत्तम भाजी आहे.
गुणधर्म :
पालक भाजीचा रस सेवन केला असता रक्तपित्त, कफ, श्वास व विषदोष नाहीसा होतो. पालकाची भाजी तिखट, मधुर, हितकारक, शीतल, रुक्ष, वातूळ, ग्राहक, भेदक, तर्पण, संतोषकारक, जड आणि चविष्ट असते.
घटक :
जीवनसत्त्व ए160 ग्रॅम
जीवनसत्त्व बी100 ग्रॅम
जीवनसत्त्व सी100 ग्रॅम
पाणी91.7 टक्के
प्रोटीन1.9 टक्के
चरबी0.9 टक्के
कार्बोदित पदार्थ4 टक्के
खनिज पदार्थ1.5 टक्के
कॅल्शियम0.06 टक्के
फॉस्फरस0.01 टक्के
लोह5 मि. ग्रॅम.
अल्प मॅग्नेशियम, गंधक, सोडियम, सिलिकॉन व पोटॅशियम, औषधी उपयोग :
पालकाचे वाफवून सूप प्यायल्यास तो आरोग्यदायी असतो तरीसुद्धा पालकाचा कच्चा रसच अधिक गुणकारी आहे. पालकाच्या भाजीत ऑक्झलेट्सचे प्रमाण अधिक असल्याने मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी या भाजीचा आहारात समावेश फार जपून करावा. पालकाचा रस मूत्रगामी आहे. तो पित्ताच्या तक्रारी दूर करतो. स्त्रियांच्या अनेक आजारांवर पालकाचा रस विशेष उपयोगी आहे. पांडुरोगात पालकाचा रस घ्यावा कारण त्यात लोहतत्त्व असल्याने तो पचन चांगले करतो. या भाजीतील क्षारांमुळे शरीरातील आम्लता कमी होते आणि शरीर निरोगी होते.