Lokesh Kanagaraj : दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय दिग्दर्शक लोकेश कनगराज (Lokesh Kanagaraj) एक माहिती शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. लोकेशने सोशल मीडियाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. कैथी, विक्रम, लिओ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन लोकेशने केला आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. पण आता त्याच्या या निर्णयाने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
साऊथमधील प्रभावी दिग्दर्शकांच्या यादीत लोकेशच्या नावाचा समावेश होतो. प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांच्या विक्रम या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रकारचे सिनेमॅटिक प्रेझेंटेशन करण्याची भूमिका लोकेशने सुरू केली होती. त्यामुळे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
लोकेशनं एक प्रेस नोट प्रसिद्ध केली असून त्यामध्ये त्यानं यापुढील काळात आपण सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म आणि मोबाईल यापासून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले आहे. आपल्याला आगामी काळात प्रोजेक्टवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचे त्यानं हे म्हटले आहे. याशिवाय लोकेशने पदार्पणापासूनच प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे.
🤗❤️ pic.twitter.com/0EL6PAlbdQ
— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) December 16, 2023
मात्र त्याच्या सोशल मीडियाच्या ब्रेक घेण्याच्या बातमीनं अनेकांना धक्का दिला आहे. खरं तर यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियातून ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे. हिंदी, मराठी, मनोरंजन विश्वातील कित्येक सेलिब्रेटी हे सोशल मीडियापासून दूर राहतात. त्यात आता साऊथच्या लोकेश कनगराजची भर पडली आहे. सध्या लोकेश त्याच्या आगामी थलायवर 171 या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे.