महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाच्या जीवनावरील एक वेबसिरीज लवकरच रिलीज होणार आहे. या वेबसिरीजचा टीजर नुकताच रिलीज झाला, या टीजरमध्ये मॅराडोनाच्या फुटबॉल करिअरमधील सर्वात यशस्वी क्षण दर्शवले आहेत.
मॅराडोनाने अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्याच्या फुटबॉल स्कीलवर सर्व जग फिदा झालेले होते. एका सामन्यात हाताला चेंडू लागून गोल झाल्यावर मॅराडोनाने प्रामाणिकपणे आपली चूक कबूल करून खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले होते.
त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक उतार चढाव आणि नाट्यमय घटना घडल्या होत्या. याशिवाय त्याच्या काही चुकाही त्याला महागात पडल्या होत्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हार्ट ऍटॅकने मॅराडोनाचे निधन झाले होते. त्याच्या आयुष्यावरील ही वेबसिरीज लवकरच ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर दाखवली जाणार आहे.