कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले असते. यंदाचा हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या सोहळ्याचं यंदाचं 92 व्या वर्ष होते.
View this post on Instagram
कलाकारांची मेहनत, अभिनय कलेने गाठलेली एक वेगळी उंची आणि तंत्रज्ञानाचा वापर करत अधिक बहरलेली ही चित्रपट साकारण्याची कला नेमकी किती उंची गाठू शकते याची अनुभूती यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून दिसून आली.
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूड कलाकारांचा झगमगाट तर होताच. पण, त्यासोबतच बाजी मारली ती म्हणजे ‘उत्कर्ष अम्बुडकर’ या भारतीय तरुणाने. उत्कर्ष हा मूळचा महाराष्ट्रीयन आहे. त्याने यंदा Oscars 2020च्या मंचावर स्वत: लिहिलेलं रॅप ऐकवलं.
न्यूयॉर्कमधील टिस्क स्कूल ऑफ आर्टमधून उत्कर्षने अभिनयाचं शिक्षण घेतलं. पण, तरीही त्याने या क्षेत्रात पुढे न जाता रॅपिंग क्षेत्रातच नावलौकिक मिळवलं.