आजकाल प्रत्येक लग्नाच्या निमित्ताने किंवा एखाद्या फंक्शनच्या निमित्ताने हमखास मेहंदी काढली जाते. आपल्याकडे हातांना मेहंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढणे हा तर एक सोहळाच असतो. केस रंगवण्यासाठीही मेहंदी लावली जाते. मात्र या मेहंदीचेही दुष्परिणाम होतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ? मेहंदी
जाणून घ्या मेहंदीचे दुष्परिणाम
त्वचारोग
मेहंदी जरी नैसर्गिकरित्या मिळत असली तरी, काहीवेळा कमी कालावधीमध्ये अधिक गडद रंगण्यासाठी तिच्यात (पॅरा-फेनिलीनडायअमाइन)मिसळतात. बऱ्याच जणांना हे माहीत नसते की, त्वचेच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते. उदा : खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे. तसेच मेहंदी फिकट होऊ लागते किंवा तिचे पापुद्रे सुटू लागतात.
केसांना शुष्कता
केसांना लावण्याची मेहंदी तयार करताना त्यामध्ये अनेक घातक रासायनिक घटक मिसळल्यामुळे केस शुष्क होतात. तसेच डोक्याला खाज सुटते, कधीकधी पुरळही येऊ शकतात.
डोळे लाल होतात
मेहंदी चा डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे लाल होतात किंवा डोळ्यांतून पाणी येऊ लागते. अशा वेळी थंड पाण्याने डोळे धुवावेत व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लाल पेशी फुटणे
ज्या मुलांना (6 ग्लुकोज फॉस्पेट डिहायड्रोजनेजची) कमतरता असेल त्यांच्या हातांना मेहंदी लावू नये. नाहीतर त्यांच्या शरीरातील लाल पेशी फुटून शारिरीक समस्या निर्माण होतील. असे काही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पोट बिघडणे
कोणत्याही स्वरुपातील मेहंदी पोटात जाणे मानवी आरोग्यासाठी घातक असते. चुकूनही थोडीफार मेहंदी पोटात गेली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.