Kangana Ranaut : बॉलीवूडची पंगा क्वीन अर्थात अभिनेत्री कंगणा राणावत तिच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा वादग्रस्त वक्त्व्यामुळे ती अडचणीत सापडली आहे. मात्र आता कंगणा तिच्या विधानामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिला एका मिस्ट्री मॅनसोबत बघितलं गेलं. सलून सेशनमधून बाहेर पडताना त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यावेळी कंगना आणि तिच्यासोबतचा तरुण हातात हात घालून चालत असल्याचे पाहायला मिळाले.
यादरम्यान दोघांनीही पापाराझींसमोर पोझ दिली आणि तेथून निघून गेले. तेव्हापासूनच विविध चर्चांना सुरूवात झाली आहे. कंगनासोबत दिसलेला तो तरूण आहे तरी कोण , ती त्याच्याशी लग्न करणार आहे का असे एक ना अनेक हजारो प्रश्न त्या एका फोटोमुळे उपस्थित झाले आहेत, नेटकऱ्यांनाही असे प्रश्न पडले असून बरीच चर्चा सुरू झाली आहे. तर काही जणांनी ‘हा तर हृतिक रोशनसारखाच दिसतोय’, ‘अखेर हृतिकसारखा दिसणारा शोधलाच’ अशा कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांना मात्र दोघांची जोडी पसंतीस पडली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कंगना आणि हृतिक यांच्या अफेअरची यापूर्वी प्रचंड चर्चा रंगली होती. अनेकदा दोघांमध्ये झालेले वाद देखील समोर आले. त्यानंतर आता हृतिक सबा आजाद हिला डेट करत आहे. नुकतेच हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सबाने एक रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
कंगनाच्या कामाबद्दगल बोलायचं झालं तर, कंगना ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनयासह तिने दिग्दर्शनही केलं आहे. आधी हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित होणार होता, पण आता तो 2024 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहे.