शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 250 वर
शिरूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आज शिरूर तालुक्यातील 11 गावात 35 कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
कोरोनाची वाढती संख्या पाहता शिरूर तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर झाला असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून आता मात्र शिरूर तालुका हादरला आहे. शिरूर शहरात सरदार पेठ 1, डंबेनाला 2, कामाठीपूरा 1, प्रीतम नगर 2, रेव्हेन्यूकॉलनी 1, शिरूर शहरात भाजी बाजार येथे 46 वर्षीय महिला, हुडको कॉलनी येथील 25 वर्षीय महिला, सोनार आळी येथील 55 वर्षीय पुरुष असे मिळून 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या 47 झाली असल्याची माहिती शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पाटील यांनी दिली.
शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 250 वर पोहचला आहे. आज नव्याने सापडलेल्या रुग्णामध्ये शिरूर शहरात 10 व तालुक्यातील शिक्रापूर 7, विठ्ठलवाडी 1, गोलेगाव 2, कारेगाव 1, पिंपळसुटी 4, तळेगाव ढमढेरे 1 , न्हावरा 1, रांजणगाव 2, मांडवगण 5, शिरुर ग्रामीण 1 असे 11 गावात 35 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेणेही गरजेचे आहे. शिरूर शहरात रोजच कोरोणाचे रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये रुग्ण सापडत असल्यामुळे शहरासह तालुक्याची स्थिती गंभीर होत चालली आहे.